लोकमंगल पतसंस्था जुना विडी घरकुल शाखेच्यावतीने वृक्षारोपण संपन्न


सोलापूर,दि.1 जुलै, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) वसुंधरा सप्ताह निम्मित लोकमंगल पतसंस्था शाखेतर्फे जुना विडी घरकुल येथे वीर कोहिनूर अपार्टमेंट येथे हिरवीगार झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित खातेदार कॉलनीतील सर्व महिला व पुरुष यांना पर्यावरण संरक्षणाची गरज तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास वीर कोहिनूर अपार्टमेंट मधील चेअरमन व शाखेतील खातेदार उपस्थित होते.
1.सरोजिनी महाकाई
2.सुनंदा गाजुल
3.महादेवी भोरे
4.प्रेमीला दुध्याल
- नागने रुक्मिणीबाई
6.कणे सिंधु
7.नागने किसन
8.यादगिरी बलराम तसेच लोकमंगल पतसंस्थेचे सल्लागार सौरभ माने, लोकमंगल पतसंस्थेचे शाखाधिकारी साठे अमोल, शाखाधिकारी बिराजदार शोभा यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी जास्वंद, कागदी फुले,चिंचे, आपटाचे, शिवरी ,करंज, आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
विडी घरकुल येथील शाखेतील सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
🌳वृक्ष लावा ,वृक्ष जगवा .
वृक्षापासून फळे फुले मिळवा .
करी वृक्ष ,प्रदूषण दूर,शुद्ध करी हवा,ऑक्सिजन देई भरपूर.चला तर मग
‘झाडे लावू, झाडे जगवू’ ।।🌳 हा संदेश देण्यात आला.



