
घटनेच्या निषेधार्थ सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूरात आंदोलन

सोलापूर दि २१ , ( शहर प्रतिनिधी )
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे अवघ्या ३.५ वर्षाच्या चिमुकलीला संजय खैरनार नावाच्या नराधमाने शारीरिक अत्याचार करून निर्घृनपणे तिची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष मीनल रास यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की आता यापुढे कुठेही महिलांवर तसेच मुलींवर अन्याय अत्याचार झाल्यास गुन्हेगारांना शिक्षा न झाल्यास कॅन्डल मार्च घेऊन निदर्शन करत बसायचे नाही तर इथून पुढे आरोपीला तत्काळ पिढीतेच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यावे कुटुंबीय ठरवतील आरोपीला कोणती शिक्षा द्यायची . यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांनीही निषेध नोंदविला .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष मीनलदास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे,संतोष सुरवसे, बबन अण्णा माने,जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते, शहराध्यक्ष मनीषा कोळी,पूजा कलागते, राधा घुले, सुनंदा सूर्यवंशी,सुनिता कारंडे, गीता अंजीखाने, विद्या देशमुख, मनीषा डोंगरे, संगीता डोंगरे, सविता मिरगाळे,सिद्धावा हत्यानुर, लक्ष्मी किरंगी यांच्यासह महिला तसेच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



