
दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे महादेव कोगणुरे यांचे आवाहन

विंचूर, दि. १७ (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे देवकाते कुटुंबीयांच्या घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, देवकाते कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीतग्रस्त देवकाते कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले. तसेच फाउंडेशनच्या वतीने तातडीची मदत देत कुटुंबाला धीर दिला.

यावेळी महादेव कोगनुरे म्हणाले, “देवकाते कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. एका क्षणात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन शक्य ती मदत करावी.”
दरम्यान, संकटाच्या काळात एम. के. फाउंडेशनने तत्परतेने केलेल्या मदतीचे कौतुक होत असून, जळीतग्रस्त देवकाते कुटुंबाला आधार देण्यासाठी नागरिकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी एम. के. फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



