
13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

कंदलगाव, दि २१ सप्टेंबर, ( प्रतिनिधी – राहुल उडाणशिव )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे तीन पाणी जुगार खेळत असताना मंद्रूप मिळून आलेल्या 13 जणांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि चार दुचाकी असा एकूण 4 लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टाकळी, दक्षिण सोलापूर येथे करण्यात आली. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यातील पोशि/664 गणेश जगन्नाथ पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 21 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2.54 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात रोहन रमेश चौगुले (रा. वरून, ता. दक्षिण सोलापूर), सिद्धू तोडी कट्टी, राजकुमार लक्ष्मण सगाई, सुभाष सिद्धाराम कुंभार, उमेश इरगोंडा बिराजदार, बसवराज जन्म, लक्ष्मण सिद्राम वंजारी, रवी बगले, शिवानंद लक्ष्मण घोडके, सचिन मेढेदार (सर्व रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर), महेश भीमाशंकर तांडोरे (रा. बळकोटा, ता. दक्षिण सोलापूर), गुंडुराव बंडू पोद्दार व राजशेखर गायकवाड (दोघे रा. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 70 हजार 500 रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच हिरो एचएफ डिलक्स व हिरो स्प्लेंडर प्लस अशा चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 4 लाख 53 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नसून बीएनएसएस कलम 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
सदर आरोपी नमूद वर्णनाची व किंमतीची रोख रक्कम व तीन पाणी जुगार खेळत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम PSI पाटील यांनी केले असून, पुढील तपास PSI डांगे करीत आहेत.



