Nation

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार शहानुर मुलानी यांची वळसंग येथे बदली

कंदलगाव ग्रामस्थांच्यावतीने मुलांनी यांचा सन्मान

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार शहानुर मुलानी यांची वळसंग येथे बदली; कंदलगाव ग्रामस्थांकडून सन्मान

​कंदलगाव – प्रतिनिधी – राहुल उडाणशिव द.लोकतंत्र नेशन नेटवर्क

मंद्रूप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि आपल्या शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ओळखले जाणारे पोलीस हवालदार शहानुर मुलानी (फकीर) यांची नुकतीच वळसंग पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या या बदलीनिमित्त कंदलगाव आणि भंडारकवठा बीटमधील त्यांच्या पाच वर्षांच्या उत्कृष्ट कार्यकाळाचा गौरव करण्यासाठी कंदलगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

मंद्रूप पोलीस ठाण्यात ​पाच वर्षांचा कार्यकाळ अन् उल्लेखनीय कामगिरी

​हवालदार शहानुर मुलानी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कंदलगाव व भंडारकवठा बीट येथे ‘बीट मार्शल’ म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थे सह समाजात सलोखा आणि सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला.
तरुण पिढीला व्यसनाधीनते सारख्या घातक सवयींपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळवले.

​ गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्यासह समाजाला घातक ठरणाऱ्या समाजकंटकांवर आणि अवैध घटकांवर त्यांनी जरब बसवला होता.



​शहानुर मुलानी यांच्या याच जनहितैषी आणि धडक कामगिरीची दखल घेत कंदलगाव येथील नागरिकांनी त्यांचा पुष्प हार, फेटा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. बदली झाली असली तरी त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून हा सत्कार करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
​​या सत्कार सोहळ्याप्रसंगी पत्रकार व प्रगतशील बागायतदार नागनाथ जोकारे, सुरेश वाघमोडे , सागर समाने, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी आणि पत्रकार राहुल उडाणशिव यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक, तरुण आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच मुलानी यांच्या पुढील वाटचालीस व भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button