Nation

रिल्सचे व्यसन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक : पी.आय शंकर पटवारी


मंद्रूप, दि. १० जून – ( राहुल उडाणशिव ) डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप येथे एमएस-सीआयटी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप व तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, निंबर्गी येथील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यांपासून एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पाराव कोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, निंबर्गी गावचे पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार, मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजीत जवळकोटे, उपसंचालक अविनाश जवळकोटे, तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट निंबर्गीचे संचालक आदित्य जवळकोटे तसेच पत्रकार अरिफ नदाफ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शंकर पटवारी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर टाळावा. रिल्स पाहण्याचे व्यसन आजच्या तरुण पिढीत वाढत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून प्रगती साधावी; मात्र पारंपरिक अभ्यास पद्धतीलाही विसरू नये.”
पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा योग्य व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. एआयचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये, असे त्यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला. “संकटे कायमस्वरूपी नसतात. कोणत्याही अडचणींना घाबरून न जाता आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगा,” असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे यांनी एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाचे महत्त्व, संगणक शिक्षणाची गरज तसेच भविष्यातील एआय तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात बसवनगर येथील मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल जवळकोटे परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमशंकर जवळकोटे यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत जवळकोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदित्य जवळकोटे यांनी मानले.

चौकट :
“विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर टाळावा. रिल्स पाहण्याचे व्यसन अभ्यासावर विपरीत परिणाम करते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान संपादन करावे व पारंपरिक अभ्यास पद्धतीलाही महत्त्व द्यावे.”
पोलीस निरीक्षक शंकर पटवारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button