मध्य रेल्वे पंढरपूरसाठी ०२ आषाढी विशेष गाड्या चालवणार


सोलापूर , दि २१ , ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) मध्य रेल्वेद्वारे, आजपासून म्हणजे दिनांक २२.०७.२०२६ ते दिनांक २९.०७.२०२६ या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी, पंढरपूर आणि दादर दरम्यान ०२ आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.
याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
दादर – पंढरपूर – दादर विशेष गाड्या (२ सेवा)
गाडी क्रमांक 01045 विशेष गाडी दिनांक २४.७.२०२६ रोजी १२:५० वाजता दादर येथून सुटेल आणि त्याच दिवशी २१:१५ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (१ फेरी)
गाडी क्रमांक 01046 विशेष गाडी दिनांक २६.७.२०२६ रोजी ००:१५ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११:४५ वाजता दादर येथे पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी.
गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण: आषाढी विशेष गाडी क्रमांक 01045 आणि गाडी क्रमांक 01046 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्याही चालविण्यात येतील.
प्रवासी तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.
दिनांक: २० जुलै, २०२६
प्र. प. क्रमांक: २०२६/०७/४२
सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.



