Nation

अनलॉक काढण्यासाठी घेतली लाच अन स्वतःच झाला अॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात लॉक

७/१२ उतारा अनलॉक करण्यासाठी मंडल अधिकारी हेमंत फुलारी यांनी घेतली रुपये ३०००/- लाच

बार्शी, दि २८, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) आरोपी लोकसेवक हेमंत चंद्रकांत फुलारी, वय ५३ वर्षे, पद मंडळ अधिकारी, नेमणुक उपळे (दुमाला) मंडळ, तहसिल कार्यालय, बार्शी ता.बार्शी, जि.सोलापूर, रा. प्लॅटनं. ४०७ मन्मीत ब्लॉसम, चौथा मजला, जुनी आयएमएस शाळेजवळ, जुळे सोलापूर, यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांनी शेतजमीनीचे ७/१२ उतारावर वारस म्हणून त्यांचे आजीचे नाव नोंद होणेकरीता दिलेले अर्जावरून नोंदीस प्रमाणित करण्यासाठी व ७/१२ उताराचे लॉक काढून देणेसाठी (अनलॉक करणेसाठी) पडताळणी दरम्यान पंचासमक्ष ३,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम ३०००/- रू ही सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्विकारले आहे.

हेमंत चंद्रकांत फुलारी, वय- ५३ वर्षे, पद- मंडळ अधिकारी, नेमणुक- उपळे (दुमाला) मंडळ, तहसिल कार्यालय, बार्शी ता. बार्शी, जि. सोलापूर, रा. प्लॅटनं. ४०७ मन्मीत ब्लॉसम, चौथा मजला, जुनी आयएमएस शाळेजवळ, जुळे सोलापूर,यातील तक्रारदार यांनी त्यांचे आजीचे वडील मयत झालेले असलेने त्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उतारावर वारस म्हणून त्यांचे आजीचे नाव नोंद होणे करीता दिलेले अर्जावरूनतलाठी यांनी धरलेल्या नोंदीस प्रमाणित करण्यासाठी व ७/१२ उताराचे लॉक काढूनदेणेसाठी(अनलॉक करणेसाठी) यातील आरोपी लोकसेवक श्री. फुलारी पद- मंडळ अधिकारी, नेमणुक उपळे(दुमाला) मंडळ, तहसिल कार्यालय, बार्शी यांनी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष ३,०००/- रुपयेलाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम ३०००/- रू ही सापळा कारवाई दरम्यान स्वतःस्विकारले आहे. .कारवाई वरून आलोसे फुलारी यांचेविरूध्द गुन्हा नोंदकरणेची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे मो.क्र ९८२३१६७१५४, श्री.अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे. मो.क्र ९०२९०३०५३० श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर. मो.क्र. ९८२३२२५४६५, यांचे मार्गदर्शनाखाली शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर पोलीस हवालदारस्वामीराव जाधव, पोलीस हवालदार सलीम मुल्ला, चापोकॉ अक्षय श्रीराम सर्व नेमणुक एसीबी सोलापूर यांनी केली.लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करूनदेणेसाठी कायदेशीर फी व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरकार्यालयास संपर्क साधण्याचे आवहन श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर. मो.क्र.९८२३२२५४६५ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button