Nation

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी मंच सोलापूर यांच्यावतीने ॲड मिलिंद थोबडे यांचा सत्कार

सोलापूर, दि. २९ एप्रिल (द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क)डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच, सोलापूर तर्फे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक लढवून प्रतिनिधित्व केल्याबद्दल ॲड मिलिंद थोबडे यांनी भरघोस मते घेऊन सोलापूर वकिलांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल आज सकाळी सोलापूर बार हॉलमध्ये सत्कार करण्यात आला… याप्रसंगी सोलापूर विधी मंचचे अध्यक्ष ॲड शताब्दीकुमार दोड्यानूर यांनी ॲड मिलिंद थोबडे यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.सत्कार स्वीकारताना ॲड मिलिंद थोबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या पदाधिकारी तसेच सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी मंचचे अध्यक्ष ॲड शताब्दीकुमार दोड्यानूर, मार्गदर्शक ॲड संजीव सदाफुले आणि ॲड अजय रणशृंगारे,ॲड दीपक हुलसुरे ॲड विनोद सूर्यवंशी ॲड सत्यजित वाघमारे ॲड चंद्रसेन गायकवाड ॲड अक्षय सोनकांबळे ॲड अभिषेक गायकवाड ॲड मलिक कांबळे ॲड विशाल मस्के ॲड भगवान बांगर ॲड आकाश प्याटी ॲड आकाश माने यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी मंच सोलापूरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button