Nation

वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यात दोन महिलांना शहर गुन्हे शाखेने केले जेरबंद

सोलापूर दि. २८ , ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क ) सोलापुरातील सिद्धेश्वर गड्डा यात्रा, लग्नकार्य तसेच रात्री घरातून दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना  शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद करून त्यांचकडील एकूण त्यांच्याजवळील असलेल्या रोख रकमेसह  ३,०८,४००/- रुपये किंमतीचे २७ ग्रॅम सोन्याचे व १.५ ग्रॅम चांदीचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेनी  दिली.   

सोलापूर शहरामध्ये घरफोडी – चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. गोहर हसन पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अति. कार्यभार गुन्हे, श्री. मच्छिंद्र पंडित सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा अति. कार्यभार गुन्हे, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.

                                                                 सविस्तर वृत्त

घटना अ) त्यानुसार श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.उप.नि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकास गोपनीय माहितीच्या आधारे दि. २६/०८/२०२६ रोजी सोलापूर ग्रामीण हद्दीतील महिला नामे- नीता किरण काळे वय- ४५ वर्ष, रा. म.पो. शिरापूर रोड, लोकमंगल साखर कारखाना जवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर हिच ताब्यात घेऊन तिच्याकडे चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, तिने सिद्धेश्वर गड्डा यात्रेमध्ये चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने तिच्याकडून १.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, रोख रक्कम रु. ६,०००/- हस्तगत करून फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र. नं. ४०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

तसेच घटना ब) दि. २७/०८/२०२६ रोजी पो.उप.नि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर शहर हद्दीतील महिला नामे- सौ. मोनिका प्रशांत रोहिटे वय- ३२ वर्ष, राहणार- लहान गणपती वस्ती, जुनी लक्ष्मी मिल चाळ, होटगी रोड, नागोबा मंदिर जवळ सोलापूर हिच ताब्यात घेऊन तिच्याकडे चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, तिने हिप्परगा गाव तुळजापूर रोड येथे लग्न कार्यामध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने तिच्याकडून २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचा लक्ष्मी हार, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोरमाळ असा एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत रु. ३,००,०००/- हस्तगत करून जेलरोड पेठ पोलीस ठाणे गु.र. नं. २८३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५ (a) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

अशा प्रकारे पो.उप.नि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकाने वरील ०२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी २७ ग्रॅम वजनाचे सोने, १.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम ६,०००/- रुपये अशी एकूण ३,०८,४००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. गोहर हसन पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अति. कार्यभार गुन्हे, श्री. मच्छिंद्र पंडित सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा अति. कार्यभार गुन्हे, श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. श्री. मुकेश गायकवाड व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार- नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, महिला अंमलदार- सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, चालक बाळू काळे, सतीश काटे, यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button