Nation

मंद्रूप पोलिसांची ‘सिने-स्टाईल’ कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांत उघड!

​

मंद्रूप, दि. २५ एप्रिल, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडलेल्या एका खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या ६ तासांत यश आले आहे. अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री फिर्यादी हे आपल्या आयशर टेम्पोमधून मालवाहतूक करत असताना, मलसिध्दप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवला. आरोपींनी फिर्यादीस बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ₹२०,०००/- रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळ काढला.

​घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूपचे पोलीस निरीक्षक श्री. शंकर पटवारी यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले.

​तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

​पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करून त्यांचा ‘सिने-स्टाईल’ पाठलाग केला. अत्यंत शिताफीने कारवाई करत पोलिसांनी ३ पैकी २ आरोपींना जेरबंद केले, तर तिसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​सदरची धडाकेबाज कारवाई खालील पथकाने यशस्वी केली:

​मार्गदर्शक: पो.नि. शंकर पटवारी

​अधिकारी: पो.उप.नि. राज डांगे

​अंमलदार: सहा.फौ. बापू शिंदे, पो.कॉ. माजिद शेख, संदीप काळे, चालक श्रीशैल शिवणे.

​”पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचा धडाका लावला आहे. अवघ्या ६ तासांत झालेली ही कारवाई गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारी ठरली आहे.”

​पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button