चक्क मौजमस्ती आणि व्यसनासाठी वृद्धेला लुटले;दोन अल्पवयीन मुले फौजदार चावडी D.B. पथकाच्या ताब्यात

दोन अल्पवयीन मुले फौजदार चावडी D.B. पथकाच्या ताब्यात

सोलापूर दि. १० ( द लोकतंत्र नेशन )
०२ विधीसंघर्षग्रस्त बालकांकडुन चैन स्नॅचींग मधील ३३ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसुत्र तसेच गुन्हयात वापरलेली ०१ मोटार सायकल, व ०२ मोबाईल असा एकुण ५,५८,५८८/- रु. किमतीचा मुद्येमाल हस्तगत
करुन अवघ्या २ दिवसात गुन्हा उघड करण्यात आला. फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक.०७/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०६.४५ वा. च्या सुमारास एका काळया रंगाचे पल्सर मोटारसायकलवर दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात येवुन अवंती नगर,
सोलापूर येथील मेडप्लस मेडीकल दुकानाचे समोर असलेले कॉर्नर, याठिकाणी फिर्यादी नामे सौ. विजयालक्ष्मी
धोडीराम सावळे, वय ६६ वर्षे, व्यवसाय गृहीणी, राहणार-घर नं.बी १५ अवंती नगर, जुना पुना नाका, मुरारजी
पेठ सोलापूर या त्यांचे दोन मैत्रीणींसोबत पायी चालत जात असताना त्यांचे जवळ मोटारसायकल नेवुन त्यांचे
गळ्यातील दोन वाटया असलेले मणी मंगळसुत्र हे जबरदस्तीने हिसकावुन चोरून भरधाव वेगात निघुन गेले
होते. सदर मोटारसायकल ही काळया रंगाची पल्सर असुन त्यास दोन्ही बाजुस नंबर प्लेट नव्हते. सदर बाबत
माहीती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाणे,सोलापूर शहर गुरनं. ३०८/२०२६ भा. न्या.संहिता. २०२३ चे कलम
३०४(२),३(५) अन्वये दि.०७/०४/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनास्थळी मा.
सहा.पोलीस आयुक्त विभाग -१, प्रताप पोमण,मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत यांनी भेट देवुन सदर
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन त्याच प्रमाणे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने फौजदार चावडी
पोलीस ठाणेकडील डी.बी.पथकातील सपोनि संजय क्षिरसागर व पथक यांना सदर गुन्हयाचा तपास करुन
आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाचा तपास डी.बी.पथकाचे सपोनिरी क्षिरसागर व पथक करत असताना तांत्रीक तपास
घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन मिळालेल्या माहीतीवरुन शोध घेत असता दरम्यान
सपोनिरी क्षिरसागर यांना त्यांचे बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन सलग ०२ दिवस रात्र आरोपीतांचा बीड येथे
जावुन शोध घेतला असता सदर गुन्हा केलेल ०२ विधीसंघर्षग्रस्त बालक हे मिळुन आले. त्यांचेकडे सदर
विधीसंघर्षग्रस्त बालकांचे पालक यांचेसमक्ष चौकशी करता सदर विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी व्यसनासाठी पैसे
नसल्याने मौजमजा करण्यासाठी व व्यसनासाठी काळया रंगाचे पल्सर मोटारसायकलवर सोलापुर मध्ये येवुन
सदर गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांनी सदर गुन्हयात फिर्यादी यांची जबरी चोरी केलेले ३३ ग्रॅम सोन्याचे मणी
मंगळसुत्र हजर केले. तरी सदर गुन्हयामध्ये गुन्हयात वापरलेली काळया रंगाची पल्सर २२० मोटारसायकल,
तसेच दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असे एकुण ५,५८,५८८/- रु. किमतीचा मुद्येमाल हस्तगत
करण्यात आला आहे.
अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय क्षिरसागर व पथकाने दोन दिवस रात्र सतत व कौशल्यपुर्ण तपास
करुन पायी चालत जाणा-या फिर्यादी महिलेचे गळयातील दोन अनोळखी मोटारसायकलस्वार यांनी जबरदस्तीने
चोरी केलेले सोन्याचे मणी मंगळसुत्र परत मिळवुन देवुन चैन स्नॅचींगचा गुन्हा उघड केला आणी पोलीसांबददल
त्याचे मनात आत्मविश्वास निर्माण करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. एम.राजकुमार सो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ)
श्री.विजय कबाडे,मा. सहा.पोलीस आयुक्त विभाग -१, प्रताप पोमण, वपोनि श्री.महादेव राउत, दुपोनि तानाजी
दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर,
पोह/बसवेश्वर परीट, पोना शिवानंद भिमदे, पोकों/विनोद व्हटकर, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकों कृष्णा बडुरे,
पोका सुरज सोनवलकर, पोका अमोल खरटमल, पोकों/शशिकांत दराडे, पोकों/अयाज बागलकोटे, पोका अजय
चव्हाण, पोकॉविनायक जाधव, पोकों/पंकज घाडगे, पोकॉ सुधाकर माने, पोकॉ रवी धेंडे, पोकों/अतिश पाटील
पोको ज्ञानेन्यर गायकवाड,पोको नितीन मोरे, पोको,तीसीफ शेख यांनी केलेली आह



