Nation
Trending
ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने मुळेगाव तांड्याची तहान भागणार ; बेरार फायनान्स लिमिटेड यांच्या पुढाकाराने आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून मुळेगाव तांड्यातील ग्रामस्थांसाठी पाडले बोरवेल

बेरार फायनान्स लिमिटेड यांच्या पुढाकाराने आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून मुळेगाव तांड्यातील ग्रामस्थांसाठी पाडले बोरवेल

सोलापूर दि . ०९ एप्रिल ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क)पहाट उपक्रमांतर्गत सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मुळेगाव तांडा येथील ग्रामस्थांसाठी बोरवेलची निर्मिती केली.
दरवर्षी उन्हाळयामध्ये मौजे मुळेगाव तांडा ता.द.सोलापूर येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असते. श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांना मुळेगांव तांडयाचे भेटीच्या दरम्यान पाण्याची समस्या दिसुन आली.
तेंव्हा मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्या बाबत पोनि/राहुल देशपांडे यांना पाण्याची समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे मा.पोनि/राहुल देशपांडे यांनी नागपूर येथील बेरार फायनान्स लिमिटेड या कंपनीस संपर्क साधुन त्यांना कंपनीच्या सी.एस.आर फंडातुन बोरवेल पाडुन देण्याची विनंती केली तेंव्हा कंपनी कडुन बोरवेल पाडुन देण्याची तयार दर्शवली.
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी ऑपरेशन परिवर्तन व पहाट उपक्रमांतर्गत मौजे मुळेगांव तांडा येथे चोरून अवैध गावंठी हातभट्टी दारू गाळणा-या इसम व त्यांना मदत करणा-या महिलांना अवैध गावंठी दारूच्या व्यवसाया पासुन परावृत्त करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे करीता उपाय योजना राबविल्या आहेत.
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री.संकेत देवळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 09.04.2026 रोजी मौजे मुळेगांव तांडा येथे बेरार फायनान्स कंपनीच्या सी.एस.आर फंडातुन मौजे मुळेगांव तांडा, ग्रामपंचायतीच्या सहका-यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे व सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पुढाकार घेऊन मौजे मुळेगाव तांडा येथे बोरवेलची निर्मिती केली आहे.
सदर बोरवेलच्या निर्मितीची मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आज दिनांक 09.04.2026 रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.
सदर उदघाटन प्रसंगी मा.श्री.अतुल कुलकर्णी यांनी बरेच आयुवैदिक वनऔषधी नष्ट होत चालले असून त्यामुळे पोलीस प्रशासन गावा गावात जर संबंधीत गावातील नागरिक इच्छुक असतील तर त्या गावात औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तेंव्हा मौजे मुळेगाव तांडयाच्या ग्रामस्थांनी त्यास होकार दर्शविला असून त्यासाठी त्यांनी 1 एकर जागा औषधी वनस्पतीची लागवड करीता देण्याचे मान्य केले आहे.
सदर कार्यक्रमा करीता पोनि/राहुल देशपांडे, सपोनि/सोमनाथ कदम, बेरार फायनान्स लिमिटेड नागपूरचे श्री.संदीप जावंजळ, व्यवस्थापकीय संचालक, अभिजित महाजन, अशिष राठी, सतीश पोहाडरे व आशुतोष दुबे व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार व मौजे मुळेगाव तांडा येथील ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते.



