Nation
Trending

शिवराज मुगळेंना राज्यस्तरीय ‘डायमंड पुरस्कार जाहीर…


कंदलगांव दि.१०, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)
मंद्रूप येथील तायक्वांदो प्रशिक्षक शिवराज मुगळे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक राज्यस्तरीय डायमंड २०२६” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

इंग्लिश मिडीयम स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन बारामती यांच्या वतीने येत्या १६ एप्रिल रोजी बारामती येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुगळे यांनी तायक्वांदो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कार्य करत त्यांनी अनेक गुणवंत खेळाडू घडविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून मंद्रूपचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची व क्रीडाप्रेमाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या घोषणेमुळे मुगळे यांचे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही अधिकाधिक खेळाडू घडवून क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देऊ असे मुगळे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button