सोलापूर विद्यापीठात आजपासून सामाजिकशास्त्रांमधील नवे प्रवाह या विषयावर राष्ट्रीय परिषद


सोलापूर, दिनांक १०, (प्रतिनिधी शांताराम वाघमारे) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलाच्या वतीने उद्यापासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सामाजिक शास्त्रांमधील नवे प्रवाह’ या विषयावरील या परिषदेचे उद्घाटन गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता विद्यापीठ संकुलात संपन्न होणार आहे. ही परिषद ’पीएम-उषा’ अंतर्गत बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ अनुदानाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. दिग्गजांची उपस्थितीया उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. प्रकाश महानवर भूषवणार आहेत. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथील कुलगुरू मा. प्रा. उमाकांत दश उपस्थित राहणार रहाणार आहेत. अशी माहिती सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली.राष्ट्रीय परिषदेविषयी बोलताना डॉ. गौतम कांबळे कांबळे म्हणाले, जागतिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक शास्त्रांचे स्वरूपही बदलत आहे. या नवीन प्रवाहांवर चर्चा करणे, संशोधकांना व्यासपीठ मिळवून देणे आणि आंतरविद्याशाखीय संशोधन दृष्टिकोन विकसित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवस चालणार्या या परिषदेत विविध सत्रांमध्ये देशपातळीवरील तज्ज्ञ आणि संशोधक आपले 100 पेक्षा अधिक शोधनिबंध सादर करणार आहेत.या परिषदेत डेक्कन कॉलेजचे डॉ. प्रबोध शिरवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सुनिल नरवडे, विजापूर येथील अक्कामहादेवी महिला विद्यापीठातील डॉ. डि. एम. मदारी, हैद्राबाद येथील मौलाना आझात राष्ट्रीय उर्दु विद्यापीठातील अधिष्ठाता मोहमद फरीयाद पहिल्या दिवशी विषयाची मांडणी करणार आहेत. तर दुसर्यादिवशी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन डॉ. शिवाजी शिंदे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. रेखा शेळके, केंद्रीय विद्यापीठ कर्नाटका कलबुर्गी येथील डॉ. संदिप इनामपुडी, मुंबई येथील डॉ. होमीभाभा विद्यापीठातील डॉ. अनिल चौगुले, हैद्राबाद विद्यापीठातील डॉ. नितिन तागडे विषयाची मांडणी करणार आहेत. तर समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप केंद्राचे संचालक डॉ. रमेश चौगुले यांच्या उपस्थितीत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.परिषदेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. हाजीमलंग शेख आणि डॉ. श्रीनिवास भंडारे यांच्यासह विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. या राष्ट्रीय परिषदेमुळे सोलापूरमधील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, जास्तीत जास्त संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. गौतम कांबळे, पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.



