Nation
Trending

एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्समध्ये विद्यार्थिनींने मिळवले घवघवीत यश

सोलापूर दि १० (प्रतिनिधी राहुल उडाणशिव), एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्समध्ये विद्यार्थिनींने मिळवले घवघवीत यश मिळवले असून त्या विध्यार्थिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप येथील एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्समध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. श्रेया सुभाष सुतार हिने १०० पैकी १०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली असून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच कु. अंकिता बगले हिने ९९ गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल जवळकोटे परिवार व संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी सोमशंकर जवळकोटे सर, नूतन पंचायत समिती सदस्य मा. मळसिद्ध मुगळे , संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे, अविनाश जवळकोटे, शिवराज मुगळे,डॉ सुदर्शन राठोड,सुतार सर तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे संस्थेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button