Nation
Trending

सोलापूरचे पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांची 'भारत श्री' मास्टर्स स्पर्धेत मोठी झेप; देशात पाचवे!

सोलापूर दि. १० , (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) सोलापूर पोलीस दलात कार्यरत असणारे भागवत शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ४०+ ‘भारत श्री’ मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशात पाचवा क्रमांक पटकावून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व त्यांची सुकन्या देखील राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून चमकदार यश संपादन केले आहे

भागवत शिंदे हे पोलीस खात्यातील आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत आहेत. पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध सराव केला होता. त्यांच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिंदे यांच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button