Nation

पंढरपूरच्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती !

पंढरपूर, दिनांक 10 ऑगस्ट, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ): पंढरपूरच्या पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरसह चार तालुक्यांच्या पोलिस प्रशासनाला आता स्वतंत्र नेतृत्व मिळणार आहे.

गृह विभागाने पंढरपूरसाठी स्वतंत्र अपर पोलिस अधीक्षक कार्यालयासह आवश्यक मनुष्यबळाला मंजुरी दिली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलिस प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. प्रेरणा कट्टे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपअधीक्षक म्हणून पोलिस दलात प्रवेश केला. सेवाकाळात नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर तसेच पिंपरी-चिंचवड येथे विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख आहे.

पंढरपूर हे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आणि वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असलेले शहर असल्याने स्वतंत्र अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाची निर्मिती महत्त्वाची मानली जात आहे. नव्या कार्यालयाची पहिली जबाबदारी प्रेरणा कट्टे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने पोलिस प्रशासनाकडून अधिक प्रभावी नियोजन आणि कडक कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button