मोटार सायकल चोरीचे ०६ गुन्हे व मोबाईल चोरीचा ०१ गुन्हा असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

सोलापूर,दि . २४ ( प्रतिनिधी )
मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे ग्रेड पो.उप.नि. शामकांत जाधव व पथकातील पोलीस अंमलदार पोह/1379 बापू साठे, पोशि/1725 सुभाष मुंढे, पोशि/1712 सैपन सय्यद, पोशि/1602 वसिम शेख असे मिळून रात्रगस्त दरम्यान सोलापूर शहरातील रेकॉर्डवरील आरोपींना चेक करत असताना, दि. 20/11/2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम त्याच्या ताब्यामध्ये एक शाईन मोटार सायकल घेवून संशयितरित्या कुमठा नाका येथील क्रिडा संकुलच्या मागे असणाऱ्या लेप्रसि कॉलनी सोलापूर येथे थांबला आहे. सदर बातमीचा आशय वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावून इसम नामे- करणकुमार हरी राठोड वय ३८ वर्षे रा. प्लॉट नं. १२ गणेश नगर, नवीन आर.टी.ओ. ऑफीसजवळ, विजापूर रोड, सोलापूर यास ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटार सायकल क्र. MH-13-EG-6737 या मोटार सायकलबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने, “स्टुम फायनान्समध्ये टु व्हिलर रिकवरी एजंट म्हणून काम करत होतो. सध्या मी सदरचे काम सोडले आहे. पूर्वी, मी स्टुम फायनान्समध्ये काम करत असताना सोलापूर येथील अॅक्सेस बँकेमध्ये लोन असलेल्या व सदरचे लोन न-भरलेल्या ०६ मोटार सायकल सोलापूर शहरातील विविध ठिकाणांवरून उचलून घेवून त्या मोटार सायकल अॅक्सेस बँकेच्या डम्प यार्डला न-लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्या आहेत.” असे सांगितले.
त्यावरून सदर इसमाकडून नमूद ०६ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. मिळालेल्या मोटार सायकलबाबत सोलापूर शहरातील मोटार सायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटार सायकली चोरीबाबत खालील नमूद तक्त्याप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
नमूद आरोपीकडून मिळालेल्या मोटार सायकली या नमूद गुन्ह्यातील चोरीच्या मोटार सायकली असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी करणकुमार हरी राठोड यास दि. 20/11/2025 रोजी ताब्यात घेवून त्याच्याकडून ०६ मोटार सायकली जप्त करून एकूण ४,२०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ०६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जप्त केलेल्या मोटार सायकलींची माहिती
| अ.क्र. | पोलीस ठाणेचे नाव | गु.र.नं व कलम | जप्त मोटार सायकल |
| १ | सदर बझार पोलीस ठाणे | ९३१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) | होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्र. MH १३ EB १३९५ (बदलून टाकलेला क्र. MH १३ EG ६७३७) |
| २ | सदर बझार पोलीस ठाणे | ९२९/२०२५ भा.दं.वि. कलम ३७९ | होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्र. MH १३ DU ६४०५ |
| ३ | सदर बझार पोलीस ठाणे | ९३०/२०२५ भा.दं.वि. कलम ३७९ | सुझुकी कंपनीची अॅक्सीस मोटार सायकल क्र. MH १३ DZ ४४२० |
| ४ | फौजदार चावडी पोलीस ठाणे | ८४२/२०२५ मा.न्या.सं. कलम ३०३ (२) | हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्र. MH १३ DV ८०४६ |
| ५ | फौजदार चावडी पोलीस ठाणे | ८४३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) | बजाज कंपनीची पल्सर एन.एस. १२५ मोटार सायकल क्र. MH २५ BC ०२८५ |
| ६ | फौजदार चावडी पोलीस ठाणे | ८४१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) | सुझुकी कंपनीची अॅक्सीस मोटार सायकल क्र. MH १३ EH ६५२१ |
मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस
तसेच इसम नामे मूजाहीद हमीद मनियार वय १९ वर्षे रा. घर नं. ४४४/३ खडी मिशनजवळ, नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. ताज मेडीकलच्या पाठीमागे, अशोक चौक, सोलापूर यास दि. 16/11/2025 रोजी ताब्यात घेवून त्याने चोरलेला १०,०००/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी A14 5G मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करून सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९१९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
एकूण कामगिरीचा सारांश
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरीचे ०६ गुन्हे व मोबाईल चोरीचा ०१ गुन्हा असे एकूण ०७ गुन्ह्यांतील एकूण ४,३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्तमप्रकारे कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, ग्रेड पो.उप.नि. शामकांत जाधव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.



