सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुशाल जैन यांची नियुक्ती; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली

कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली

सोलापूर: दि १५ एप्रिल, ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशाल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुलदीप जंगम यांची यशस्वी कारकीर्द
कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. सोलापुरातील त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
विशेषत पारदर्शक प्रशासन: जिल्हा परिषदेतील प्रलंबित अनुकंपा भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवून त्यांनी प्रशासनाचा नावलौकिक वाढवला.
लोकप्रियता: एक शांत, संयमी आणि ‘रिस्पेक्टफुल’ अधिकारी म्हणून त्यांनी सोलापूरकरांची मने जिंकली होती.
नवे सीईओ कुशाल जैन: परिचय आणि शैक्षणिक प्रवास
नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाल जैन हे २०२२ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेला एक तरुण आणि तंत्रस्नेही नेतृत्व मिळाले आहे.कुशाल जैन यांनी आयएएस होण्यापूर्वी मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत काम केले आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील असल्याने, सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटलायझेशनला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुरवातीला त्यांना आंध्र प्रदेश कॅडर मिळाले होते, मात्र नंतर त्यांची बदली महाराष्ट्र कॅडरमध्ये झाली. आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची धुरा त्यांच्या खांद्यावर असणार आहे.



