Nation
Trending

सरकारी जागेत विनापरवाना पुतळा बसवून कायदा हातात घेणाऱ्यांवर मोहोळ पोलिसांचा दणका ; १२ आरोपी निष्पन्न, कडक कारवाईचा इशारा !

१२ आरोपी निष्पन्न, कडक कारवाईचा इशारा !

मोहोळ, दि. ०१ मार्च, ( प्रतिनिधी सचिन गवळी ) -राष्ट्रीय महामार्गावरील सरकारी जमिनीवर मध्यरात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे अतिक्रमण करून पुतळा बसवणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध मोहोळ पोलिसांनी कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना निष्पन्न करण्यात आले असून, त्यांच्यावर अटकेची व तडीपारीची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर कृत्य :-दिनांक २२/०२/२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास, मोहोळ बस स्टॅन्ड समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील एन एच ए आय च्या मालकीच्या सरकारी जागेत (साखळी क्र.०.०२०) काही इसमांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता, दबा धरून अतिक्रमण केले. एका लोखंडीस्टँडवर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा अनधिकृतपणे बसवून शासकीय नियमांचे जाहीर उल्लंघन केले आहे.

पोलिसांचा कठोर कारवाईचा बडगा :-या गंभीर प्रकाराची दखल घेत, फिर्यादी मुकेश कुमार सिंह ( उपप्रबंधक NHAI) यांच्यातक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ३२९ (३) सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई :-१२ संशयित आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असुन त्यांची नावे प्रविण उर्फ पांडु गायकवाड, संग्राम उर्फ संघर्ष शंकर जगताप, निलेश नंदकुमार गायकवाड, तुषार भगवान शिंदे, संग्राम दत्ताय गायकवाड, महेश बबन देशमुख, सुदर्शन सुभाष गायकवाड, स्वप्निल धनंजय देशमुख, योगेश महादेव दाईंगडे, रोहित सुभाष गायकवाड, अजय देवकते, बालाजी सुरेश शिंदे, पवन दिलीप गायकवाड, आकाश उर्फ अक्षय अरुण चव्हाण, त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. असे श्री बाजीराव पोवार,पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईचा हिसका :-केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, या आरोपींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई (PreventiveAction) करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील सराईत गुन्हेगार यांच्यावर तडीपार कारवाई करण्यात येणार. असे श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण यांनी सांगितले आहे.

अज्ञात सूत्रधारांचा शोध :सदरच्या कृत्यामागे असलेल्या इतर सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत असून, कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणारआहे.

प्रशासकीय इशारा :सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे किंवा कायद्याचे उल्लंघन करून भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस आपल्या पद्धतीने धडा शिकवतील. प्रत्येक आरोपीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मार्गदर्शक अधिकारी :- सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण),मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर (सोलापूर ग्रामीण), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाजीराव पोवार व त्यांचे पथक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button