

कंदलगांव, द. सोलापूर, दि १२. (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)
दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाने वर्चस्व मिळविले असून सभापती पदी या गटाचे संदीप टेळे तर उपसभापती पदी वर्षा सोमनाथ पटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारा जागा पैकी सहा जागेवर आमदार सचिन कल्याणशेट्टी तर पाच जागेवर आमदार सुभाष देशमुख गटाचे सदस्य विजयी झाले होते. शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली होती. आमदार देशमुख गटाचे संदीप टेळे व पंचप्पा धनशेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी यांच्या माध्यमातून आमदार कल्याणशेट्टी गटात प्रवेश केला होता आणि शिवसेनेच्या सदस्याने सुद्धा कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यामुळे कल्याणशेट्टी यांच्याकडे तब्बल नऊ सदस्य झाले तर आमदार देशमुख यांच्याकडे प्रियंका आसबे,अंबिका पाटील, अंबिका दुपारगुडे असे तीन सदस्य राहिले होते.गुरूवारी अक्कलकोट येथे भाजपच्या संपर्क कार्यालयात या नऊ सदस्यांची बैठक झाली.
सभापतीपदी मळसिद्ध मुगळे तर उपसभापती वर्षा पटणे यांचे नाव पूर्वीपासूनच आघाडीवर होते. मात्र आमदार कल्याणशेट्टी यांनी मनाचा मोठेपणा दाखवित पूर्वाश्रमीचे आमदार देशमुख गटाचे व सध्या कल्याणशेट्टी गटाचे सदस्य औरादचे संदीप टेळे यांना सभापतीपद तर बोरामणीच्या वर्षा पटणे यांना उपसभापती पद देण्याचा निर्णय घेतला.यावेळी सभापती व उपसभापती पदासाठी टेळे व पटणे यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने दोघांची सभापती आणि उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी केली.यावेळी निवड सभेस पंचायत समितीचे नूतन सदस्य मळसिद्ध मुगळे, प्रियांका आसबे, शिल्पा बिराजदार, बलवान गोतसुर्वे,
पंचप्पा धनशेट्टी, सूरज पाटील,विजय राठोड, अंबिका पाटील, अंबिका दुपारगुडे, प्रियांका खुपसंगे उपस्थित होते.या निवडीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी व नेताजी खंडागळे, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, युवा संचालक मनिष देशमुख, अतुल गायकवाड,महादेव पाटील(मुस्ती) तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,सोमनाथ पटणे, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, जगन्नाथ गायकवाड शांतकुमार गडदे, सिध्दाराम हेले, प्रशांत कडते, मल्लू चिवडशेट्टी, शिवानंद पाटील(औराद) नितीन रणखांबे,कल्याणी कोकरे आदी उपस्थित होते.