Nation
Trending

तामलवाडी पोलिसांची यशस्वी कारवाई; घरफोडी प्रकरणाचा पूर्ण उलगडा

तुळजापुर दि २९.(प्रतिनिधी सुरज थोरात) तामलवाडी पोलिसांनी वडगाव काटी येथील घरफोडी प्रकरणाचा अखेर पूर्ण उलगडा करत चौथ्या आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

प्रकरण सविस्तर :
१२ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी सपाटे यांच्या वडगाव काटी येथील घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाच्या प्रारंभी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून चार सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या होत्या.

तपासाची दिशा पुढे नेत पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे बंडू उर्फ बंदेनवाज मधुकर पवार, रा. ढोकबाभळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर यास चौथा आरोपी म्हणून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले आणखी दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

जप्त मुद्देमालामध्ये

दोन सोन्याच्या बिंदल्या

सोन्याचे ‘मनी मंगळसूत्र’

सोन्याचे कानातील दागिने

या दागिन्यांसह यापूर्वी जप्त केलेल्या चार सोन्याच्या अंगठ्यांमुळे पोलिसांनी एकूण महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, तसेच डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणारे पथकमध्ये

सपोनि गोकुळ ठाकूर

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे

अंमलदार : जुबेर काळजी, दिनकर दोघे, आकाश सुरनर, नजीर बागवान, सुरज नरवडे, गोपाळ सलगर, नेताजी गेजगे सहभागी होते.

या पथकाने समन्वयाने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

तामलवाडी पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट झाला असून गुन्हे उकलण्यात पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button