Nation

७० फुट येथील शिवकुमार ज्वेलर्सला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या.

गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल व जबरी चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत ; शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी


सोलापूर दि १७ जून ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ). सोलापूरात भरदिवसा आणि कायम वर्दळ असलेला भाग मे. शिवकुमार ज्वेलर्स हे दिनांक १३/०६/२०२६ रोजी दुपारी १२:३० वा. चे सुमारास अॅक्सेस स्कुटीवर आलेल्या ०३ इसमांनी ज्वेलर्स दुकानामध्ये घुसून पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे दोन नेकलेस जबरी चोरी केल्याबाबत सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.४८०/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०९ ( २ ) ३०९ (४), ३(५) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर जबरी चोरीची गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणणे बाबत मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे /वि.शा.),श्री. दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.वरील नमुद जबरी चोरीचा गंभीर गुन्हा घडल्याने नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 04 तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे यांनी गुन्ह्याचे घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 250 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून मिळविलेल्या तांत्रिक व गोपनिय माहितीचे आधारे आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक 13/06/2026 रोजी शिवकुमार ज्वेलर्स 70 फूट रोड सोलापूर या दुकानातुन जबरी चोरी केलेले 02 सोन्याचे नेकलेस विक्री करण्यासाठी 02 इसम हे होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोटार सायकलवर अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरा नजिक थांबलेले आहेत .वरील प्राप्त गोपनिय माहितीची खात्री करून बातमीचे ठिकाणी गुन्हे शाखेकडील तपास पथके व पोलीस अमलदार यांनी सापळा रचून अॅक्टीव्हा मोटार सायकलवरील 02 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विचारपूस करता त्यांची नावे (1) जिलानी म.रफिक दामटे,वय 33 वर्षे, सध्या रा. 70 फूट रोड नुरूल इस्लाम मस्जिदच्या बोळात सोलापूर मुळ राह. सर्व्हे नं. 12, लक्ष्मी नगर| फिरदोस मस्जिदचे पाठीमागे, येरवडा पुणे (2) साहिल उर्फ भाई नवी नंदियाल वय 24 वर्ष, सध्या रा. जमा मस्जिद समोर सलगरवाडी, डोणगाव रोड सोलापूर मुळ रा. सर्व्हे नं. 12, लक्ष्मी नगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले.त्यावेळी नमूद 02 इसमांपैकी जिलानी याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेस असलेल्या पट्टयामध्ये खोचलेली देशी बनावटीची पिस्टल सोबत 03 जिवंत काडतुसे व पॅटचे उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. तसेच दुसरा इसम साहिल याची अंगझडतीमध्ये त्याचे पँटच्या उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात रेडमी कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला.त्यानंतर गुन्ह्याचे अनुषंगाने सदर इसमांकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की,
दि.09/06/2026 रोजी वरील दोघे व त्यांचा आणखी एक साथीदार मित्र नामे ( 3 ) रेहान उर्फ जडया रमजान लडाफ उर्फ शेख रा. मिल्लत नगर, शाहाबाद जि. कलबुर्गी राज्य कर्नाटक सध्या रा. नुरानी मस्जिद शेजारी, लक्ष्मी नगर,येरवडा पुणे. असे एकत्र सोलापूर या ठिकाणी जमले होते. त्यांनी शिवकुमार ज्वेलर्स शॉपची रेकी करून ते लुटण्याची योजना आखली. त्यानुसार साहिल उर्फ भाई नंदियाल व रेहान उर्फ जड्या यांनी गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोटार सायकल दिनांक 12/06/2026 रोजी कुर्डुवाडी जि.सोलापूर येथून चोरी केली. त्यानंतर ते दोघे सदर वाहनावर दिनांक 13/06/2026 रोजी सोलापूर या ठिकाणी आले. सोलापूर येथे आल्यावर ते तिघे एकमेकांशी संपर्कात येवून एकत्र येवून नमूद ज्वेलर्स शॉपमध्ये जावून दुकान मालकास पिस्टलचा धाक दाखवून जबरीने 02 सोन्याचे नेकलेस चोरून नेले होते. चोरी करताना दुकान मालकाने जोर
जोराने आरडा ओरडा केल्यामुळे लोक त्या ठिकाणी जमून त्यांना पकडतील या भितीने गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेले होते. गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल ही कुर्डुवाडी
जि. सोलापूर येथून चोरलेली असून त्या बाबत कुर्डुवाडी पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गु.र.नं. 280/2026 भा. न्या. सं. कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल आहे.अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे व निलेश सोनवणे पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा व एक मोटार सायकल चोरीचा असे 02 गुन्हे उघडकीस आणून खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील,
पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / वि.शा.), श्री. दिलीप पवार सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे,
निलेश पाटील-सोनवणे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद
जमादार, घिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपुत, सिध्दाराम देशमुख,
विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी
सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार
पवार, शेलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे,
अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब
काळे, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, फरदिन शेख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button