Nation
Trending

एकाच दिवशी तरुण आणि तरुणीची आत्महत्या : मंद्रूप, बसवनगर हादरले . दोन वेगवेगळ्या घटनेची मंद्रूप पोलिस ठाण्यात नोंद

मंद्रूप दि. ७ मार्च (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) मंद्रूप आणि बसवनगर येथे शुक्रवारी (दि.६ मार्च ) दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण आणि एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 

पहिली घटना – बसवनगर येथे घडली . पल्लवी किसान पवार ( वय १९, रा. बसवनगर, ता. दक्षिण सोलापूर ) हिने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीचे वडील किसान लालसिंग पवार ही रिक्शा चालक असून ते शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रिक्शा घेऊन बसवनगर येथे स्टॉपवर गेले होते . दरवाजा आतून बंद असल्याने संदेश पवार आणि रमेश नाईक यांनी दरवाजा तोडून अंत पहिले असता हा प्रकार लक्षात आला. तिला मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. 

दुसरी घटना –  मंद्रूप येथील सकळेश्वर गल्ली परिसरात घडली . अभिजीत सिद्रामप्पा  मेंडगुदले ( वय २५, रा. सकळेश्वर गल्ली मंद्रूप ) या तरुणाने घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिजितचा मंद्रूप येथे मोटरसायकल शोरूमचा व्यवसाय होता. गुरुवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास त्याचा भाऊ सुमित मेंडगुदले जागा झाला असता अभिजीत खोलीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले , त्याने शेजारच्या खोलीत पाहिले तर अभिजीत हा गळफास घेतलेलता अवस्थेत आढळून आला. तात्काळ त्याला मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता . उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

दोन्ही वेगवेगळ्या घटनेनी मंद्रूप आणि बसवनगर परिसरात एकाच खळबळ उडाली असून या दुर्दैवी घटनेने हळहळ होत आहे . या दोन्ही प्रकरणाची मंद्रूप पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंदे व सहाय्यक फौजदार बापू शिंदे , पोलिस नाईक सचिन मसलखांब करत आहेत.    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button