Nation

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संघटकपदी रजनीकांत इंगळे यांची निवड

सोलापूर, दिनांक 21 ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क )
महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संघटकपदी
मा. रजनीकांत इंगळे यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या वतीने त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले असून ह्या निवडीमुळे मा.रजनीकांत इंगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संस्थेच्या वार्षिक मिटिंगमध्ये संस्थेने संघटक पदी 36 लोकांची यादी जाहीर केली असून त्या सर्वांना निवडीचे पत्र पाठवण्यात आले.

दरवर्षी राज्यभरात व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने व्यसनमुक्ती पुरस्कार दिला जातो,

त्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये मा.रजनीकांत इंगळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या संघटक पदी प्राधान्याने निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button