Nation
Trending

सोलापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष वाहन तपासणी धडक मोहीम

१९३ वाहनांची तपासणी, ६५ वाहनांना चलन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

सोलापूर – प्रतिनिधी : रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १९३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांना चलन (मेमो) बजावण्यात आले.

या कारवाईतून एकूण २४.६० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तपासणीदरम्यान भंगार रिक्षा, अल्पवयीन चालकांकडून चालविण्यात येणारी वाहने, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) नसलेली वाहने, वाहन चालविण्याचा वैध परवाना नसलेले चालक, वैध योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या रिक्षा, विमा नसलेली वाहने तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या निर्देशानुसार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, दिनेश ढोकणे, गणेश तपकिरे, प्रणव चव्हाण, श्रेयस सरागे आणि धनंजय थोरे यांनी आपल्या पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह या मोहिमेत सहभाग घेतला. वाहनधारकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध व अद्ययावत ठेवावीत. वाहनासंबंधी लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करावे. असे आव्हान प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्यावतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button