Nation
Trending

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड

सरचिटणीसपदी आफताब शेख तर खजिनदारपदी विजय गायकवाड

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड झाली. सरचिटणीसपदी एबीपी माझाचे प्रतिनिधी आफताब शेख, तर खजिनदारपदी दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२६-२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी मावळते सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाचा इतिवृत्तांत सादर केला, तर मावळते खजिनदार किरण बनसोडे यांनी जमाखर्चाचा तपशील सभेसमोर मांडला. सभेने दोन्ही अहवालांना एकमताने मान्यता दिल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयकुमार राजापूरे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष सिरसट यांनी काम पाहिले.

नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे : उपाध्यक्ष – अविनाश गायकवाड, नितीन पात्रे, अरविंद मोटे, संगमेश जेऊरे, रुपेश हेळवे
चिटणीस – अमोल व्यवहारे, रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित लखन अदाटे
सहचिटणीस – धनंजय मोरे, विनोद हुमनाबादकर, रोहित थळवे

कार्यकारणी सदस्य :- विजयकुमार राजापूरे, अरुण रोटे, शीतलकुमार कांबळे, समीर कार्यकर्ते, दीपक दुपारगुडे, रवींद्र दंतकाळे, राजेश कुलकर्णी, रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, पिंटू विभुते, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, अंबादास पोळ, मुजम्मील शाहनूरकर, सुदर्शन भालेराव, सागर इप्पलपल्ली, आरती कुसेकर, महेश कुलकर्णी.

सल्लागार :- प्रशांत जोशी, शंकर जाधव, हेमंत चौधरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button