Nation
Trending

बार्शीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

बार्शी शहर व तालुक्यातील जुगार अड्डे, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय, प्रतिबंधित गुटखा विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

बार्शी (प्रतिनिधी) दि. ११ ऑक्टोबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बार्शी शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत जुगारप्रकरणी तीन गुन्हे दाखल करून तब्बल ४ लाख २० हजार १०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर कारवाई करून पीडित महिलांची सुटका करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्यांचे पथक आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर कारवाईबार्शी शहरातील लातूर बायपास रस्त्यावरील ‘द मूनलाईट स्पा’ आणि बार्शी तालुक्यातील बायपास रस्त्यावरील नागोबाचीवाडी परिसरातील ‘डिलक्स स्पा’ येथे पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापे टाकून स्पा सेंटर चालक व मालकांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईदरम्यान पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.तीन जुगारप्रकरणांत गुन्हे दाखल; ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्तबार्शी शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण मटका जुगार सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी छापे टाकून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.बार्शी शहरातील सुभाष नगर परिसरात एका बंद घरामध्ये कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ३ लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसऱ्या कारवाईत बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोस्ट चौक परिसरात कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याचे आढळले. या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून ८४ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तिसरी कारवाई लता टॉकीजजवळील रोन पान शॉपच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आली. येथे कल्याण मटका जुगार घेतला जात असल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून २० हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर छापाबार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांडवी येथील बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकाजवळील ‘शिवसाक्षी’ पान टपरीवर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार छापा टाकून सुमारे २७ हजार १०४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांना माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाईबार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेत तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत, तर सात जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरूच राहणारसोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अशा धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधातही कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच विशेष पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button