Nation
Trending

चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यात सोन्याचे दागिने व दोन चोरीचे मोबाईल जप्त ; एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी; एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत,

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी;

एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत,  

सोलापूर, दि . ०४ सप्टेंबर, ( प्रतिनिधी ),

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सोन्याचे दागिने चोरीच्या दोन आणि मोबाईल चोरीच्या दोन अशा चार गुन्ह्यांचा गुन्हे प्रकटीकरण पथकाने छडा लावला आहे. या कारवाईत दोन संशयित महिलांकडून ५० ग्रॅम वजनाचे सुमारे ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तर एका सराईत आरोपीकडून २६ हजार ६४८ रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरातून सोन्याचा हार चोरीला गेल्याप्रकरणी तसेच दुसऱ्या घटनेत मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय गर्दीचा फायदा घेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरी करण्यात आले होते. या चारही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे तपास

चारही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकातील अंमलदारांनी घटनांची माहिती घेत गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयित दोन महिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी दागिने चोरीच्या घटनांबाबत कबुली दिली असून त्यांच्याकडून ५० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले.

सराईत आरोपीकडून दोन मोबाईल हस्तगत

मोबाईल चोरीच्या घटनांप्रकरणी रेकॉर्डवरील सराईत आरोपी गणेश किसन बोधीवाले, रा. लोधी गल्ली, सोलापूर याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने नमूद दोन मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २६ हजार ६४८ रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

अशाप्रकारे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील राकेश पाटील , एकनाथ उबाळे , संदीप जावळे , सचिन भांगे ,आमसिद्ध निंबाळ ,सचिनकुमार लवटे , सुहास अर्जुन , अमर शिवसिंगवाले , अजित माने , नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अविनाश डिंगोळे, अमोल खरटमल, महिला पोलीस अंमलदार नागमणी म्हेत्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button