Nation
Trending

कंदलगावात श्री कलमेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तीन महिलांनी रक्तदान करून दिला सामाजिक संदेश

कंदलगाव , ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ): कलमेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ, कंदलगाव यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कलमेश्वर मंदिरासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या शिबिरात तब्बल ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता.

सिद्धेश्वर ब्लड बँक, सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. ग्रामस्थ व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

कलमेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भारूड, भजन, कीर्तन, कन्नड नाटक, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मंडळाने सामाजिक कार्याची परंपरा जपली.

रक्तदान शिबिरात ग्रामपंचायत सदस्य उज्वला बनसोडे, उमा भारती बनसोडे आणि महानंदा उंबरजे यांनी रक्तदान केले. महिलांनी रक्तदानात सहभागी होत इतर महिलांनाही रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांसाठी रक्तदान करणे ही समाजाप्रती आपली जबाबदारी आहे,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

या शिबिरासाठी आयोजक कल्लाप्पा बनसोडे, अध्यक्ष रुद्रप्पा उंबरजे, उपाध्यक्ष बिरू गाडेकर, खजिनदार जट्टू कोरे, बिरू घोडके, माळाप्पा कोरे, राजू उंबरजे, बन्ने गुरुजी यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ व रक्तदाते उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत “उत्सवातून समाजसेवा” हा संदेश मंडळाने दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button