

मजरेवाडी, ता. उ.सोलापूर , दिनांक 9, ( प्रतिनिधी ) भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन श्री मंगलदास मूकबधीर मराठी निवासी शाळा, मजरेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्याशैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. फुले दाम्पत्याने शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून समाजातील वंचित घटकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.कार्यक्रमात शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व सांगताना, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून शिक्षणाच्या माध्यमातून आत्मविश्वास, संस्कार आणि स्वावलंबनाची जडणघडण होते, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव अरुण धोत्रे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाप यांनी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. मुलांनी शाळेत शिक्षक म्हणून मुलांना शिकवले . इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षकां प्रती आपला आदर व कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


