Nation
Trending

प्रोटान शिक्षक संघटनेचा प्रशासनाला झटका ; उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मागण्या मान्य

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मागण्या मान्य

सोलापूर , दि. ७ सप्टेंबर ( प्रतिनिधी )  प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन मिळत नसल्याबाबत बेमुदत आमरण उपोषण उपोषणाच्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.

शासन निर्णय 16 जून 2026 प्रमाणे थकीत वेतन काढण्याच्या आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत आणि त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुशल जैन यांनी संघटनेच्या थकीत वेतनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या फाइलवर सही करून संबंधित विभागाला पाठवल्याचे सांगण्यात आले.  माहे सप्टेंबर 2026 च्या वेतनासोबत थकीत वेतनाची रक्कम आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागण्यात येईल तसे लेखी पत्र आज संघटनेस सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे व प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सचिन जगताप यांनी दिले.

एकाच दिवसात आमरण उपोषणातील उपोषणकर्त्यांचे सर्व प्रश्नांना निकालात –

संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणासाठी सर्व पदाधिकारी सभासद बंद-भगिनी महिला विभागाच्या सर्व महिला प्रतिनिधी बहुसंखेने उपस्थित राहुन संघटनेची ताकत प्रशासनास निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर सचिन जगताप यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा वळविण्यात आला. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना संघटनेच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रलंबित मागण्या मार्गी लावून त्या सोडवण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button