मूकबधीर मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ; अजीज अहमद गुलाम दस्तगीर शेख याला न्यायालयाचा दणका; १० हजार रुपये दंडाचीही शिक्षा

अजीज अहमद गुलाम दस्तगीर शेख याला न्यायालयाचा दणका; १० हजार रुपये दंडाचीही शिक्षा

सोलापूर, दि, ०४ सप्टेंबर, ( Solapur City Police fb page )
मूकबधीर मुलीवरील बलात्कार व अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी अजीज अहमद गुलाम दस्तगीर शेख याला सोलापूर येथील मा. न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी आला. त्याने पीडितेला घराबाहेर नेऊन एका ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर येथे क्राईम रजिस्टर क्रमांक ३९८/२०२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे Session Case No. 375/2022 असे होते. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६(२)(i)(I), ३६३, ३५४, ३५४(A), ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी मा. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने श्रीमती डोके मॅडम यांनी प्रभावी बाजू मांडली. तपास अधिकारी सपोनि वैजनाथ कुकडे यांनी तपास करून आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तसेच दोषसिद्धी कक्षाकडील अधिकाऱ्यांनीही प्रकरणात आवश्यक पाठपुरावा केला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भादंवि कलम ३७६(२)(i)(I) अंतर्गत आजन्म सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ अंतर्गत २ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड** अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केलेला प्रभावी तपास, सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेली बाजू आणि दोषसिद्धी कक्षाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आरोपीविरुद्ध दोषसिद्धी होऊन कठोर शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.



