Nation

“शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन”

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांच्यावतीने दिनांक 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत

सोलापूर दिनांक २९ ऑगस्ट, (द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क) सोलापूर येथे “शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन” करण्यात आले असून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांच्या मार्फत सोलापूर येथे दि. 31 Aug 2026 पासून 6 दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतीपूरक उद्योग व्यवसायावर आधारित बंदिस्त शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन अशा पशुपालनावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमात शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व इतर शेतीपूरक उद्योगांवरील संधी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये शेळ्यांची निवड, आहार, उपचार व व्यवस्थापन, लसीकरण, चारा साठवून पद्धत, गोठा बांधणी, कोंबड्यांची निवड, गिरीराज कोंबडी व कोबड्यांच्या इतर जाती, आहार, उपचार, लसीकरण, बाजारपेठ, तसेच दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांची निवड, उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी, तसेच विमा, विक्री कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व, सुसंवादाची कौशल्य, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासनाच्या विविध कर्ज योजना व अनुदान विषयक माहिती, इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी शिक्षण कमीत कमी 8 वी पास. अधिक माहिती व प्रवेशासाठी विशाल सुर्वे मो. 9890560676 संपर्क साधावा.तरी सोलापूर शहरातील व परिसरातील शेतकरी तसेच बेरोजगार युवक व युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, राजशेखर शिंदे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एसबीआय-आयकॉन बिल्डिंग, किल्लेदार मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, अग्रसेन भवन समोर, आसरा चौक, होटगी रोड, सोलापूर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button