Nation

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम

अवैध मद्यनिर्मितीवर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांचे आदेश

सोलापूर, दि. 3 जून ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) पुणे येथे मिथेनॉलमिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्त व प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.  यांनी दिले आहेत.

मिथेनॉल हे अत्यंत धोकादायक असून त्याच्या सेवनामुळे कायमस्वरूपी अंधत्व, कोमात जाणे, मूत्रपिंड निकामी होणे तसेच मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायन मिश्रित दारू,  ढाबे तसेच टपऱ्यांवरील विनापरवाना विकल्या जाणाऱ्या मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button