Nation

गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महादेव कोगनुरेंची खंबीर साथ

सागर सिमेंट व एम के फाउंडेशनचा एक लाख वह्या वाटपाचा संकल्प

सोलापूर दि ३१ मे, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, या उदात्त हेतूने सागर सिमेंट व एम. के. फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून, यंदाचेही शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एक लाख वह्या वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

महागाईच्या काळात अनेक शेतकरी व कष्टकरी कुटुंबांना मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे कठीण होत आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भक्कम आधार मिळावा आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील जिल्हा परिषद शाळा, शिक्षक, विद्यार्थी व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सागर सिमेंट महाराष्ट्र राज्य व एम के फाउंडेशनचे जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“विद्यार्थ्यांच्या हातात वह्या आणि डोळ्यांत स्वप्ने देण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हीच आमची गेल्या अनेक वर्षापासून ची प्रेरणा आहे.”

टीप :

सदर उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद शाळांनी आपल्या शाळेच्या लेटरपॅडवर विद्यार्थ्यांची एकूण संख्या, इयत्तानिहाय आवश्यक वह्यांची माहिती, शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करून दि. १५ जून २०२६ पूर्वी सागर सिमेंट कार्यालय, सोलापूर येथे मागणीपत्र जमा करावे.

संपर्क :-
श्री. महांतेश बगले सर :- +919923066282

श्री अनिकेत फताटे :- 7030235020

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button