Nation

घरफोडी करणाऱ्या तेलंगणातील सराईत गुन्हेगारास ४८ तासात अटक,

सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; त्याच्याकडील एकूण 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकुण रु. 8,72,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

सोलापूर दि १६ मे ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) फिर्यादी श्रीमती रेवती सिध्देश्वर तमशेट्टी वय 63 वर्षे रा.घ.नं. 01 गीता नगर मंगलमुर्ती रेसीडेन्सी समोर गोविंदश्री मंगल कार्यालय जवळ जुळे सोलापूर या दिनांक 11/05/2026 रोजी त्यांचे घरास कुलुप लावून सह परिवार परगावी गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 09,57,000/- रु. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेले बाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 14/05/2026 रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गु.र.नं. 275/2026 भा.न्या.सं. 2023 कलम 331 (3), 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वरील घडलेल्या घरफोडीच्या घटनांचे गांभीर्य ओळखुन गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखेकडील तपास पथके नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान श्री. मुकेश गायकवाड पो. उप.निरीक्षक व त्यांचे तपास पथक यांनी सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयीत आरोपी बाबत माहिती प्राप्त केली होती. त्याअनुषंगाने नमूद पथक संशयीत आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 15/05/2026 रोजी 00:18 वा. चे सुमारास मार्केट पोलीस चौकी समोरल सार्वजनिक रस्त्यावर एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार संशयित रित्या थांबल्याचे दिसून आले. त्यावेळी पो.उप. निरीक्षक श्री मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर स्विफ्ट गाडीस शिताफीने घेराव घालून गाडीमध्ये ड्रायव्हिंग सिटवर असलेल्या संशयीत इसमास ताब्यात घेतले. नमूद इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर वय ४८ वर्षे, राहणार- घ.नं. १०-२८४/४ सत्यनारायण कॉलनी रोड नंबर नागारम केसर मंडल, जि. मल्काजगीरी, राज्य तेलंगना असे असल्याचे आढळले. तसेच सदर स्विफ्ट कारच्या तपासणीमध्ये डॅश बोर्ड ड्रॉव्हर मध्ये सोन्या-चांदिचे दागिने व रोख रक्कम आढळली. त्याबाबत नमूद आरोपीकडे कसोशीने चौकशी केली असता सदर सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हि त्याने जुळे सोलापूर येथे दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी केलेल्या घरफोडीतील असल्याचे निष्पन्न झाले. नमूद सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम ही उपरोक्त नमूद गुन्ह्यतील असल्याची खात्री झाली.अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील श्री.मुकेश गायकवाड पोलीस उप-निरीक्षक व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर यांचे ताब्यातून एकूण 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकुण रु. 8,72,000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे 48 तासांच्या आत उघडकीस आणला आहे. नमूद आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता त्यास 04 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

नमूद आंतरराज्यीय आरोपी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर याचेवर विविध राज्यामध्ये एकूण ३५ घरफोडी -चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदरची कामगिरी मा. श्री एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, श्री गौहर हसन पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) तथा प्रभारी पोलीस आयुक्त, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक श्री मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशिनाथ वाघे, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड आणि रतिकांत राजमाने यांनी केली आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button