Nation
Trending

मालोजी निंबाळकर यांचा पंचाहत्तरी निमित्त सत्कार

बहुजन योद्धा सामाजिक संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने वाढदिवस केला साजरा

धाराशिव,दि. २१ मार्च, (प्रतिनिधी सुरज थोरात) : धाराशिव शहरातील जुन्या पिढीतील वतनदार तसेच ज्येष्ठ नागरिक मालोजी निंबाळकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निंबाळकर गल्ली येथील त्यांच्या स्वगृही आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समाजातील ज्येष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती असून त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, ॲड. परवेझ काझी, ईलियास मुजावर, नंदकुमार शेटे,डॉ.विजय शिंदे,अमोल नायकल,कुणाल निंबाळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मालोजी निंबाळकर यांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button