एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दक्षिण सोलापूर विभागामार्फत सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अन्नप्राशन दिन साजरा


कंदलगाव दक्षिण सोलापूर , दि. ६. ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत, २ मार्च ते ८ मार्च २०२६.जागतिक महिला दिना निमित्त, महिला सक्षमीकरण सप्ताह सुरू असून या अंतर्गत मौजे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे, दिनांक 5 मार्च 2026 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,दक्षिण सोलापूर. विभागामार्फत सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अन्नप्राशन दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिरकले, प्रकल्प अधिकारी भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी उपस्थित महिलांकडून महिला सक्षमीकरणाची शपथ घेण्यात आली. अंगणवाडीत शिकणाऱ्या सावी संदीप उडाणशिव व गौतमी प्रफुल्ल बेसरे या दोन चिमुकल्या मुलींच्या नावे प्रत्येकी एक झाड लावण्यात आले. सुदृढ बालक या स्पर्धेत विजय ठरलेल्या साहिबा सैपन शेख या बालिकेस आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिरकले, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, विस्तार अधिकारी जाधव, पर्यवेक्षिका रूपाली ढवण, सरपंच शारदा कडते, उपसरपंच अमित नरुटे, संजय कोले, धनेश कडते यांच्यासह कंदलगाव मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये घेण्यात आला.




