Nation
Trending

ढेकरी तालुका तुळजापूर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखेची स्थापना

धाराशिव,दि. 4 मार्च ( जिल्हा प्रतिनिधी सूरज थोरात ) दिनांक 4 मार्च 2026 रोजी मौजे ढेकरी तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभा शाखेची स्थापना करून फलकाचे आनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .सर्व प्रथम तथागत भगवान बुध्द व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभा धाराशिव जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम व जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे जिल्हा संस्कार सचिव बाजीराव साबळे तुळजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे समता सैनिक दलाचे अनिल सरतापे मनोहर दावणे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमा वेळी भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा व तुळजापूर तालुका सरचिटणीस विठ्ठल सुरते तालुका संरक्षण उपाध्यक्ष कांचन चिमणे संस्कार सचिव कैलास गायकवाड अदि उपस्थित होते या वेळी नवनिर्वाचित ग्रामशाखेच्या पदाधिकारी यांचा पंचशील शेला व गुलाब पुष्प देऊन सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण सूर्यवंशी बापू माने महेंद्र सूर्यवंशी सुहास साबळे उल्हास सूर्यवंशी या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button