Nation
Trending

नवीन माध्यमिक प्रशाला ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित

बार्शी , दिनांक 13,(प्रतिनिधी) एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवीन माध्यमिक प्रशालेस ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रशालेचा गौरव करण्यात आला.यावेळी आमदार राजेंद्र राऊत, भाऊसाहेब आंधळकर, डॉ. बापूसाहेब अडसूळ (प्रदेशाध्यक्ष, एकनाथ स्वाभिमानी शिक्षण सेना), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे, तसेच जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि IAS अधिकारी उमाप, व्याख्याते गरड आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नवीन माध्यमिक प्रशालेस ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास, शिस्त, शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शाळेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे मान्यवरांनी यावेळी कौतुक केले.शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांचा सन्मान होणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे मान्यवरांनी सांगितले. शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अध्यापन पद्धतीत आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.‘आदर्श शाळा’ पुरस्कार हा केवळ शाळेचा सन्मान नसून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.पुरस्कारामुळे नवीन माध्यमिक प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.हा पुरस्कार प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे, शिक्षक बाळासाहेब डोळसे, अबूबकर इनामदार,शकील तांबोळी,नागनाथ गयाळी, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी साठे,दिलीप वाघमारे आणि दत्तात्रय शेरखाने यांनी स्वीकारला दरम्यान, या पुरस्कारामुळे नवीन माध्यमिक प्रशालेच्या शैक्षणिक कार्याची दखल व्यापक स्तरावर घेतली गेल्याने शाळेच्या वाटचालीत हा सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button