Nation
Trending

वडापूरच्या प्रभुलिंग देवाच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ, १३ पालख्यांचा भेट सोहळा: सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम


वडापुर,दक्षिण सोलापूर,दि.१२ (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील प्रभूलिंग देवाच्या यात्रेस मानाचे नंदीध्वज, काठ्या, मिरी – वडापूर येथील श्री प्रभुलिंग देवाच्या पालखी मिरवणुकीने सोमवारपासून उत्साहात प्रारंभ होणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता श्री ओग्यानमुत्त्या (होनमुर्गी), श्री मलकारसिद्ध (सोरेगाव), श्री बुळोगसिद्ध (इंदापूर, पुणे), श्री पिंड वडिया (बोराळे), श्री ओगसिद्ध (सिद्धापूर), श्री मळगालसिद्ध (मंद्रूप), श्री गेनसिद्ध (कुंभारी), श्री भंडी मलकारसिद्ध (मंद्रूप), श्री मुत्त्याप्पा वडिया (मद्रे), श्री अमोगसिद्ध (तेवरट्टी, कर्नाटक), श्री भुताळसिद्ध (सिद्धापूर), श्री प्रभुलिंग (मिरी) व श्री प्रभुलिंग (वडापूर) या १३ पालख्यांचा अमृतमय भेटी सोहळा होणार आहे. रात्री ९ वाजता श्रीअमोगसिद्ध गायन संघ, मिरजगी (अमोगसिद्ध मास्तर) व श्री महाळींगराया गायन संघ हळळूर (सत्यपा मास्तर) यांच्यामध्ये कन्नड ढोलावरची गाणी होतील.
१७ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांचे नैवेद्य, दुपारी २ वाजता पैलवानांच्या जोड्या ठरवणे व ४ वाजता मल्लांच्या भव्य कुस्त्या होतील. रात्री ७ वाजता नयनरम्य शोभेचे दारूकाम आणि ८ वाजता बालाजी शिरसाट यांचे सोंगी भारुड होईल.
१८ फेब्रुवारी रोजी दिवसभर लेकीचा नैवेद्य. दुपारनंतर सर्व पालख्यांचा कर तोडणे, सायंकाळी ७ वाजता लावण्यखणी हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. हा यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री परमानंद देव ट्रस्ट, श्री प्रभुलिंग यात्रा कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

यात्रेचे वैशिष्ट्य व सुविधा….
तीन दिवस अखंड महाप्रसाद, दोन मजली भव्य महाप्रसाद कक्ष, प्रशस्त पालखीतळ, निसर्गाने नटलेले मंदिर परिसर, भव्य अन देखणी शंकराची मूर्ती, सुंदर व रेखीव असे शिल्प.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button