Nation
Trending

कौठाळीतील सोलार प्लेट व पॅनलचे स्टचर अँगल चोरीच्या गुन्ह्यात पाच आरोपींना सोलापूर तालुका, पोलिसांनी घेतले ताब्यात

उत्तर सोलापूर दि. २४ (प्रतिनिधी )

मौजे कौठाळी ता. उत्तर सोलापूर येथे कौठाळी ते वैराग जाणाऱ्या रोडवर पुरूषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून सोलार प्लेट पासुन वीज निमिती करण्याचे काम चालु आहे. कॅबीनच्या समोर ठेवलेले एकूण 8 लाख 78 हजार 190 रूपये किंमतीचे सोलार प्लेट व पॅनलचे स्टचरचे अॅंगल दिनांक 23.11.2025 रोजी 11.00 वा. ते दिनांक 18.01.2026 रोजीचे 10.00 वा. सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद आदित्य भाऊसाहेब जाधव, रा. शारदादेवी नगर, मोहोळ रोड वैराग ताः बाशी जि. सोलापूर यांनी दिली होती. सदर फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दिनांक 19.01.2026 रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हयाचा तपास पोना/अनंत चमके, याचेकडे देण्यात आला होता.

मा.श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर पोलीस ठाणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मौजे कौठाळो येथील सोलार प्लेट व पॅनेलच्या अंगलची चोरी मौजे कौठाळी येथील एकूण 5 संशयित आरोपी यांनी केली आहे.

मिळालेल्या बातमी प्रमाणे मा.श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर पोलीस ठाणे यांनी पोना चमके व पोलीस ठाणे कडील ताबे पोलीस अंमलदार यांना मौजे कौठाळी येथे जाऊन संशयित आरोपी यांच्या ठावठिकाणाची माहिती घेऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार यांनी मौजे कौठाळी येथे जाऊन संशयित आरोपी यांच्या ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आजुबाजुस शोध घेतला असता मिळालेल्या बातमी मधील वर्णना नुसार 5 संशयित आरोपी मिळुन आले.

मिळुन आलेल्या संशयित आरोपी यांना गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्या सर्वांकडे विचारपूस करून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सुरूवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर सर्वांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन त्याचे सोबत आणखीन 2 विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपी कडुन चोरी केलेले सोलार प्लेट व पॅनेल स्ट्रक्चर अँगल चोरी करणे करीता वापलेले 2 लाख रूपये किंमतीचे अशोक लेन्लड कंपनीचे दोस्त मॉडेलचे मालवाहतुकीचे चारचाकी वाहन वा गुन्हयात चोरीस गेलेले 7 लाख 65 हजार रूपये किमतीचे 102 गौतम कंपनीचे सोलार प्लेट व 1 लाख 13 हजार 190 रूपये किंमतीचे 147 नग धातुचे सोलार पॅनलचे स्टचर अँगल असा एकूण 10 लाख 78 हजार 130 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोना चमके हे करीत आहेत.

सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक,संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर,  राहुल आत्राम, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोहवा राहुल महिंद्रकर, पोना/अनंत चमके, पोना/लालसिंग राठोड, पोकों/पैंगबर नदाफ, पोको वैभव सुर्यवंशी व पोको सागर शिवे यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button