Nation
Trending

"श्री परमेश्वर आश्रम शाळेचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश"

कामती, मोहोळ दि २१ (अनिल वाळे वृत्त संपादक) “श्री परमेश्वर आश्रम शाळेचे शासकीय चित्रकला ग्रेड
परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे , ” माहे नोव्हें २०२५ मध्ये मुंबई कला संचालनालय, मुंबई यांच्यावतीने
घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा – २०२५-२६
चा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री परमेश्वर आश्रम
शाळेचा – “एलिमेंटरी ग्रेड परीक्षा व इंटरमीजिएट ग्रेड परीक्षा
या दोन्हीही परीक्षेचा निकाल १००% लागला असून ” A” श्रेणीतून 92 विद्यार्थी तर “B ” श्रेणीतून ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, “A” श्रेणीतून आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
ऋतुजा राठोड, अनुराधा धोत्रे , प्रतिक्षा बंडगर, प्रियांका पवार, श्रुतिका बंडगर, कार्तिकी शेळके, शुभ्रा पाटील, प्रज्ञा शेळके, भक्ती राठोड, अमित पवार, सक्षम राऊत, आदित्य इंगळे आदि विद्यार्थी “A” श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत तर आनंदी धोत्रे, अर्पिता राठोड, अवंतिका पवार,
ऋतिका पवार, राजश्री पाटील, तनुजा राठोड, समिक्षा वाघमोडे
कौशल नाटेकर हे विद्यार्थी “B” श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे.
कला शिक्षक सुरेश मलाव यांनी विद्यार्थ्यांना
मोलाचे मार्गदर्शन करून सलग ३४ वर्षे १००% निकालाची परंपरा
अबाधित ठेवली आहे. त्यांनी स्वतः तयार केलेल्या चित्रकला पुस्तकांचा
उपयोग विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी प्राप्त करण्यासाठी झाला.
प्रशालेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक: श्री सुरेश गवळी व
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत म्हेत्रे,
श्री मदने, रज्जोदीन शेख, महेंद्र नवले
यांनी सहकार्य केले.
याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष: महादेव वाळे, शाळा समितीचे
अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, सचिव बाळासाहेब डुबे पाटील
यांनीही सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button