Nation
Trending

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मराठी पत्रकार दिनानिमित्त लोकमंगलच्या सर्व पतसंस्थांमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा

मराठी पत्रकार दिनानिमित्त लोकमंगलच्या सर्व पतसंस्थांमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा

सोलापूर, दि .६ (प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या विजापूर रोड आणि बॉम्बे पार्क, अशोक चौक , रेल्वे लाइनसह सर्व शाखांमध्ये पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजातील घडामोडींचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करून जनजागृती घडविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास जोशी प्रशांत (संचार) उपसंपादक, बनसोडे किरण (तरुण भारत), अभिजीत जवळकोटे (तरुण भारत संवाद), पद्माकर कुलकर्णी (सोलापूर आकाशवाणी) व आप्पासाहेब गोटे (संचार) आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या संचालिका सरोजिनी टिपे व शाखेचे सल्लागार मल्लिकार्जुन किनगी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. भेटवस्तू, वार्षिक अहवाल, कॅलेंडर व माहितीपर पत्रके देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी पत्रकारांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले तसेच सत्य, निष्पक्ष व सकारात्मक पत्रकारितेचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. समाजाभिमुख उपक्रम पुढेही राबविण्याचा निर्धार शाखेतर्फे व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले, तर शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.
समारंभास शाखाधिकारी, कर्मचारीवर्ग व सभासद उपस्थित होते.

लोकमंगल पतसंस्था शाखा :- अशोक चौक तर्फे पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी 📰🖋️

1) श्री. मोटे अरविंद – सकाळ प्रेस वरिष्ठ वार्ताहर

2) श्री. माळशिखरे ऋषिकेश – लोकतंत्र डिजीटल न्यूज मराठी शहर प्रतिनिधी

3) श्री. मुळीक युवराज – Live महाराष्ट्र पोलिस टाईम्स शहर प्रतिनिधी

4) श्री. निसार गफूरसाब उस्ताद – दैनिक जवान क्रांती संपादक

5) श्री. पटेल हुसेन – Live महाराष्ट्र पोलिस टाईम्स ग्रामीण प्रतिनिधी 📰✒️ व सल्लागार श्रीमती. अंबळकर शोभना , श्री. पौळ दत्तात्रय व श्री. माने सौरभ यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना भेटवस्तू, पेन, अहवाल, गुलाब व कॅलेंडर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी व शाखेतील सर्व स्टाफ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button