
रिपाईच्या राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार वाटप.
सिमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम !.

सोलापूर (प्रतिनिधी):सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रेसर नेतृत्व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) राष्ट्रीय नेत्या सीमा रामदास आठवले यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. ‘सिमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत हा सोहळा सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला.या वाढदिवसानिमित्त प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मूकबधिर निवासी शाळा, मोहोळ येथील ६० मूकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले, तसेच त्यांना अल्पोपाहार देण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ – अनावश्यक वारेमाप खर्च टाळून समाजातील गरजू व विशेष घटकांसाठी असे सामाजिक उपक्रम राबवणे हीच खरी वाढदिवसाची भेट ठरते, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सिमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सामाजिक भान व संवेदनशीलतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
मान्यवरांची उपस्थिती – या प्रेरणादायी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सिमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण कांबळे यांनी केले होते. या सोहळ्याला संस्थेचे प्रमुख पदाधिकारी महेश बनसोडे, दत्ता कांबळे, नितीन पाटोळे, अतिश मोरे, ऋषी भालेराव, अमर जगताप, लखन प्रक्षाळे, सम्यक मोरे व ऋतुराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच, प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या मूकबधिर निवासी शाळेचे मुख्याध्यापक वैभव शेटे, शिक्षक समाधान सरवदे आणि शिपाई अशोक जाधवर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आणि शाळा प्रशासनाचे आभार दत्ता कांबळे यांनी मानले. या उपक्रमामुळे शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांकडून संस्थेचे विशेष कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.


