Nation
Trending

भाविकांना लुटणारे दोन चोरटे अवघ्या काही तासातच जेरबंद तुळजापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

तुळजापूर,दि. 27, (जिल्हा प्रतिनिधी सुरज थोरात)

तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या दोन कारवर 25 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या दरोड्या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या मदतीने काही तासातच तपासणी चक्र फिरवत दोन चोरट्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघे नात्याने मामा भाच्चे असून उर्वरित दोन चोरट्यांचा तपास चालू आहे. सोलापूर – तुळजापूर महामार्गावर रविवारी पहाटे, अवघ्या १५ मिनिटाच्या फरकाने दोन ठिकाणी भाविकांवर दरोडा टाकण्यात आला चाकू आणि कत्ती सदृश्य वस्तूचा धाक दाखवत अज्ञात ४ लोकांनी दुचाकीवरून येत दोन कारमधून सोन्याचे दागिने रोकड आणि मोबाईल असा एकूण मिळून सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मद्धेमाल लुटला या हल्ल्यात एका भावीकाला हाताला गंभीर दुखापत झालेली होती याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मिळालेली माहिती की गुन्हे शाखेने नागेश उतरेश्वर काळे वय 18 रा. बोरी,ता. वाशी जि. धाराशिव तसेच श्याम उत्तरेश्वर शिंदे वय 24 रा. खर्डा ता. जामखेड जि.अहिल्यानगर येथून संशयितांना बोरी येथून अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईने भाविकांना दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी तुळजापूर पोलिसांचे कौतुक केले आहे या घटनेची माहिती मिळतात तुळजापूर पोलीस ठ्याण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब साहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पदके आणि तुळजापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तपासणीसाठी रवाना केले होते. वरील गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे, तपासादरम्यान याच टोळीतील असल्याचा उलगडा झाला आहे, त्यांचा शोध पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button