Nation
Trending

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या शहर व जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार उघडे यांची निवड

उघडे यांच्यावर विविध स्तरातून होतोय शुभेछ्यांचा वर्षाव

सोलापूर दि १९ प्रतिनिधी : युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर जिल्हाध्यक्षपदी जय हो न्यूज चे संपादक विजयकुमार उघडे यांची निवड करण्यात आली आहे. विजयकुमार उघडे हे मागील 20 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ कामे करीत आहेत. आज पर्यंत जय हो वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार व समाजातील ज्वलंत प्रश्नांवर पोलखोल व प्रकाश टाकणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या. तसेच सामान्य जनतेला प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्याचे काम ते सातत्याने करत असतात. या सर्व कामांची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या यांच्याकडून सोलापूर शहर व जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार उघडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button