

सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र/अग्नीशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे
बाबत मा.पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना
विशेष मोहिम घेवून कारवाई करणे संदर्भात मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक ०४/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांचे
तपास पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ” एक इसम संत तुकाराम
चौकाजवळील एसटी स्टॅन्ड नं. ०२ चे समोर गुरूनानक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हातामध्ये लोखंडी
तलवार घेवुन जोरजोरात आरडाओरड करुन सदर ठिकाणी दहशत माजवत आहे.” प्राप्त बातमी बाबत
श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देवून त्यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक कारवाई करीता
रवाना झाले. नमुद पथक सदर ठिकाणी गेले असता प्राप्त माहितीप्रमाणे एक इसम हातात लोखंडी
तलवार घेवुन आराडाओरड करुन दहशत माजवत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी स.पो.नि. शंकर
धायगुडे व त्यांचे तपास पथकाने सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास नाव-पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मोहन नागनाथ पोतु
वय ३७ वर्षे रा. १६ शास्त्रीनगर, शिवलिंग मंदिराजवळ, सोलापूर असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर
पंचासमक्ष नमूद इसमाची झडती घेवुन त्याच्या उजव्या हातात असलेली ०२ फुट लांबीची लोखंडी तलवार
ताब्यात घेवुन जप्त करण्यात आली. नमुद इसमाने बेकायदेशीररित्या अज्ञात उद्देशाने त्याच्या ताब्यात
लोखंडी तलवार बाळगली म्हणुन त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा
कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे. तसेच
नमुद इसमास पुढील कार्यवाहीकरीता सदर बझार पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी
पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री.राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. अरविंद
माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांचे
तपास पथकातील पोलीस अंमलदार पोह अंकुश भोसले, पोह शैलेश बुगड, पोशि/राजु वाघमारे,
पोशि/अभिजीत धायगुडे यांनी केली आहे.



